Ad will apear here
Next
योगीगुरू
योगसाधनेसंबंधी मूळ बंगाली भाषेमधले एक अलौकिक पुस्तक जे उडिया, हिंदी, कन्नड आणि आसामीबरोबरच इंग्लिशमधेही अनुवादित झाले असून, ब्रिटिश म्युझियम लायब्ररीमध्ये या पुस्तकाला स्थान देण्यात आले आहे. योगाभ्यास करणाऱ्यांसाठी हृदयस्पर्शी ठरणारे आणि आध्यात्मिक मार्गात उन्नती होण्यासाठी प्रेरणा देणारे असे हे ‘योगीगुरू’ पुस्तक मराठी वाचकांसाठी आणि अभ्यासकांसाठी नीलाचल सारस्वत संघ यांनी प्रकाशित केले आहे. त्या पुस्तकाविषयी...
..................
श्रीमत् सद्गुरू स्वामी निगमानंद सरस्वती प्रभूंच्या अपार करुणेमुळे ‘योगीगुरू’ पुस्तकाचा मराठी भाषेतील अनुवाद प्रकाशित होत आहे. ‘योगीगुरू’ या पुस्तकाला लंडनमधील ब्रिटिश म्युझियम लायब्ररीमध्ये स्थान मिळाले. मूळ बंगाली भाषेतील पुस्तकाचा अनुवाद उडिया, हिंदी, इंग्लिश, आसामी, कन्नड या भाषांमध्ये झाला आहे. जगद्गुरू महादेवांनी गुप्त योग साधनेचे जतन होण्यासाठी जे सोपे आणि सरळ उपाय सांगितले आहेत, त्यांचा यात समावेश केला आहे. योग म्हणजे काय? 

‘सर्वचिन्तापरित्यागो निश्चिन्तो योग उच्यते।।’

ज्या वेळी मनुष्य सर्व चिंतांचा त्याग करतो, त्या वेळच्या त्याच्या मनाच्या स्थिर अवस्थेला ‘योग’ म्हटले जाते. सर्व साधनांचे मूळ योग आहे. योग सर्वोत्कृष्ट साधना आहे.
 
‘योगश्चितवृत्ति निरोध:।।’

हृदयाच्या सर्व वृत्तींचा निरोध करण्याचे नाव योग आहे. ग्रंथकारांनी वाणी आवाहन करून ग्रंथाच्या विषयवस्तूचा आरंभ केला आहे. समर्पणामध्ये ग्रंथकारांच्या हृदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या आहेत. या पुस्तकाच्या चार अंशांपैकी प्रथम भाग योग कल्प आहे. यामध्ये योग तत्त्व, शरीर तत्त्व, नाडींची माहिती, प्रणव तत्त्व, आठ अंगे, तंत्रयोग, हठयोग, राजयोग आणि लययोग इत्यादींची माहिती दिली आहे.   

द्वितीय भागात या साधकांसाठी साधना पद्धतीचे वर्णन केले आहे. आसन साधना, तत्त्व साधना, नाडीशुद्धी, कुंडलिनी चैतन्याचे कौशल्य, योग या साधनेसाठी आवश्यक मंत्रकल्प, दीक्षा प्रणाली याची माहिती तृतीय भागात दिली आहे. चतुर्थ भागात स्वरकल्प आणि स्वरोदय शास्त्रासंदर्भात लिहिले आहे. कलियुगातील मनुष्य साधू आणि गुरूला मानीत नाहीत. सध्याच्या त्यांच्या स्वभावातील त्रुटींमुळे गुरूंमध्ये शिष्यातील अज्ञानरूपी अंधकारास दूर करून संसारातील त्रितापरूपी विषाला नष्ट करण्याची क्षमता नाही. 
हंसतत्त्वात - जीवात्मा अनाहत कमळात दिवसरात्र साधना आणि ईश्वरचिंतन करत असतो.
 
‘सोsहं – हंसं – पदेनैव जीवो जपति सर्वदा।’

हं – शिवस्वरूप आणि स – शक्तिरूपिणी आहे. श्वास सोडून पुन्हा त्याला ग्रहण करता आला नाही, तर मृत्यू होऊ शकतो. 
आपल्या पूर्वजांनी आणि अनेक महापुरुषांनी क्रमाने प्रकाशित केलेल्या ज्ञानाच्या अस्मितेला कोणी एकाच ओंजळीने प्राशन करण्याचा प्रयत्न करत असेल, तर परमार्थप्राप्ती होणे दूरच; पण त्यामुळे अनर्थ होऊ शकतो हे अढळ सत्य आहे. अचैतन्य मंत्र केवळ वर्ण आहे. प्राणरहित शरीराप्रमाणे प्राणहीन मंत्राचा जप करण्याने काही लाभ होत नाही.

‘योग’साधनेची महती सांगताना शास्त्रात सांगितले आहे, की वेदव्यासांचे पुत्र सुखदेव पूर्वजन्मी एका झाडाच्या फांदीवर बसून महादेवांच्या मुखातून योगाची महती ऐकल्यामुळे पक्षी योनीतून त्यांचा उद्धार होऊन पुढच्या जन्मी ते परमयोगी बनले. केवळ श्रवण केल्याने एवढा लाभ होत असेल, तर योगसाधना करण्याने ब्रह्मानंद आणि सर्वसिद्धी प्राप्त होतील यात कोणतीच शंका नाही. 

बहिर्मुखी मन, परावृत्त करून बुद्धी आणि इंद्रियांच्या विषय वासनांतून अंतर्मुखी बनून सर्वव्याप्त परमात्म्याशी संयोग करण्याचे नाव ज्ञानयोग आहे. सिद्धी प्राप्त करण्यात जी विघ्नं आहेत, त्यामध्ये संशय सर्वांत जास्त धोकादायक आहे. मी जेवढे कष्ट घेत आहे, त्याचा फायदा होणार की नाही, हाच संशय या साधनेच्या मार्गातील सर्वांत मोठा काटा आहे. परंतु योगसाधनेत जेवढा अभ्यास कराल, त्याचे परिणाम नक्कीच अनुभवता येतात. श्रीकृष्णाने गीतेमध्ये योगभ्रष्ट व्यक्तीच्या मृत्यूनंतरच्या अवस्थेविषयी सांगितले आहे.

प्राप्य पुण्याकृतां लोकानुषित्वा शाश्वती: समा:
शुचिनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोsभिजायते।
अथवा योगीनामेव कुले भवति धीमताम्
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्।। (गीता ६/४१ – ४२)

सर्वसामान्य लोकांना नम्र विनंती करत ग्रंथकार सांगतात, की या धर्म विनाशाच्या संकटसमयी एक जरी साधक यातील क्रिया अनुष्ठानात सफल झाला, तरी गुरुदेवांच्या लेखणीचे सार्थक होईल. हे पुस्तक निश्चितच योगाभ्यास करणाऱ्यांसाठी हृदयस्पर्शी ठरेल. आध्यात्मिक मार्गात उन्नती होण्यासाठी प्रेरणा देईल. 

प्रणेते : परिव्राजकाचार्य परमहंस, श्रीमत् स्वामी निगमानंद सरस्वती देव 
प्रकाशक : नीलाचल सारस्वत संघ, निगम निवास, भागीरथी नगर, हडपसर, पुणे ४११०२८  
मोबाइल : ९८२२८ २७६८२  
पृष्ठे : १९८ 
मूल्य : १५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZTEBH
Similar Posts
ब्रह्मचर्य-साधन अर्थात ब्रह्मचर्य व्रतपालन नियमावली ‘ब्रह्मचर्य व्रतपालनाने आयुष्य, बळ, तत्त्व, स्वास्थ, आनंद, जीवन पुन्हा परत मिळेल. त्यामुळे परत एकदा घरोघरी व्यास, वसिष्ठ, पातंजली, गर्ग, जैमिनी जन्माला येतील,’ असे प्रतिपादन करणारे ‘ब्रह्मचर्य-साधन अर्थात ब्रह्मचर्य व्रतपालन नियमावली’ हे पुस्तक नीलाचल सारस्वत संघ यांनी प्रकाशित केले आहे. त्याबद्दल थोडक्यात
नियतीचे प्रतिबिंब हातावरच्या रेषा, उंचवटे, बांधणी, स्पर्श, रंग, हाताचा आकार, तळहातावर असणाऱ्या विविध आकृत्या (फुल्या, चांदणी, साखळी, मत्स्य, डाग), बोटांची कमी-जास्त लांबी, एकमेकींना छेडणाऱ्या रेषा, रेषांचे वळसे या सर्वांचा आपल्या शरीर प्रकृतीशी, प्रारब्धाशी असणारा संबंध यातून प्रत्येक केस कशी हाताळली आणि हस्तरेषांचा अभ्यास
झुंज श्वासाशी आजारी माणसाला उपचाराच्या शेवटच्या टप्प्यांत ऑक्सिजनची गरज भासते; पण ज्याचे हॉस्पिटलमधले प्राथमिक उपचारच ऑक्सिजन घेऊन सुरू होत असतील त्याच्या आयुष्याची शाश्वती किती कठीण? ज्याला वयाच्या १६व्या वर्षीच त्यापुढचा प्रत्येक दिवस ‘बोनस’ असणार आहे, हे कळलं असेल, त्याच्या मनाची घालमेल इतरांना कशी कळावी? मुकुल
प्रोग्रामिंग इन ‘सी’ ‘प्रोग्रामिंग इन सी फ्रॉम नॉव्हिस टू एक्स्पर्ट’ हे महेश भावे आणि सुनील पाटेकर यांनी लिहिलेलं आटोपशीर, पण ‘सी प्रोग्रामिंग’विषयी सर्व माहिती अत्यंत सुलभतेने देणारं पुस्तक आहे. नवशिक्यांपासून तज्ज्ञांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल अशा या पुस्तकाविषयी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language